कोरोना इम्पॅक्ट

Good News! महाराष्ट्रातला ‘हा’ जिल्हा सगळ्यात सुरक्षित, करोना रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाणही कमी

हिंगोली : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यापैकी हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी कोरोणा रुग्णाचे मृत्यु झाले आहेत, तसेच लागण कमी होण्याच्या हिंगोलीचाच क्रमांक लागतो. सद्या अक्टीव असलेल्या रुग्णांची संख्या सुद्धा हिंगोली तळाशी आहे. आज घडीला केवळ पाच रुग्ण या जिल्ह्यात उपचार घेत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मराठवाड्यात करोनाचा पहिला रुग्ण हा २३ मार्च २०२० रोजी औरंगाबाद आढळला होता, मग इतर जिल्हा आणि तालुक्यांत मगं गावा गावात त्याचा फैलाव झाल्याचं बघायला मिळालं. गेल्या दीड वर्षात नागरिकांनी करोना संसर्गाच्या दोन वेग वेगळ्या लाटांचा सामना केला आहे. आगामी काळात सुरक्षितता पाळली नाही तर आणखी प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिसरी लाट थोपवण्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

आतापर्यंत करोनाच्या बाबतीत औरंगाबाद शहर आणि जिल्हा अग्रेसर असल्याचे दिसून आले. त्या पाठोपाठ बीड जिल्ह्याचा क्रमांक लागतो. आतापर्यंत मराठवाड्यात ६ लाख ४२ हजार रुग्णांना करोनाची लागण होउन गेली त्यापैकी ६ लाख २४ हजार रूग्ण बरे झालेत. सद्या स्थितीत २७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागरिकांनी भयभीत न होता लसीकरण करण्यास सहभागी व्हावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, सुरक्षित अंतर पाळावे, मास्क चां नियमित वापर करावा जेणे करुन रूग्ण अंख्या वाढणार नाही याची खबरदारी आणि काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केल जात आहे.

हिंगोली आरोग्य प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत १६०६२ लोकांना करोनाची लागण झाली. त्यापैकी १५६६१ रूग्ण बरे झाले. तर आतापर्यंत ३९६ रुंगणाचा मृत्यू झाला आहे. आजच्या घडीला जिल्ह्यात ५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मराठवाड्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत ही स्थिती बरी आहे. मृत्यू दर संख्या व रुग्णांचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन चिकाटीने प्रयत्न करत आहे.

ओमिक्रॉन आणि करोनाच्या धर्तीवर १००% लसीकरण पूर्ण करून नागरिकांना सुरक्षित ठेवता यावे यासाठी हिंगोली जिल्ह्यात शर्यतीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच बरोबर कोविड -१९ रुग्णालयात इतरही भौतिक सुविधा वाढवलायचे बघायला मिळते आहे. मुबलक ऑक्सिजण पुरवठा, बेड संख्या वाढवली, त्याचं बरोबर इतरही सूविधा चा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.