देशातील नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या चिंता वाढवणारी
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशातील नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या चिंता वाढवणारी

नवी दिल्ली : देशातील नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ही डोकेदुखी ठरणारी आहे. गेल्या २४ तासात ४४ हजार २३० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या ३ कोटी १५ लाख ७२ हजार ३४४ वर पोहोचली आहे. यासोबत एकूण अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ४ लाख ५ हजार १५५वर पोहोचली आहे. तसंच गेल्या २४ तासांत ५५५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबत देशात कोरोनामुळे जीव गमावलेल्यांची संख्या ४ लाख ३२ हजार २१७ झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या नोंदवणाऱ्या राज्यांमध्ये केरळ पहिल्या क्रमांकावर असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. केरळमधील परिस्थिती चिंताजनक असून २४ तासात २२ हजार ६४ रुग्णांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे महाराष्ट्रात ७२४२ रुग्णांची नोंद झाली. यानंतर आंध्रपदेश (२१०७), कर्नाटक (२०५२) आणि तामिळनाडूचा (१८५९) क्रमांक आहे. जवळपास ८० टक्के रुग्णांची या पाच राज्यांमधून झाली असून एकट्या केरळमधून ५० टक्के रुग्णांची नोंद झाली आहे.

दुसरीकडे देशात गेल्या २४ तासांत ४२ हजार ३६९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. यासोबत आतापर्यंत एकूण ३ कोटी ७ लाख ४३ हजार ९७२ जणांनी करोनावर मात केली आहे. भारताचा रिकव्हरी रेट सध्या ९७.३८ टक्के आहे.