कोरोना रुग्णसंख्येत वाढ; अजित पवारांचे कडक निर्बंध लागू करण्याचे संकेत
कोरोना इम्पॅक्ट

कोरोना रुग्णसंख्येत वाढ; अजित पवारांचे कडक निर्बंध लागू करण्याचे संकेत

औरंगाबाद : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागू करण्याचे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे रुग्ण वाढत असल्यानं कोरोनासंदर्भात कडक निर्बंध पुन्हा एकदा लागू केले जाऊ शकतात. औरंगाबादेत आयोजित परकर परिषदेत त्यांनी याबाबत इशारा दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, ” काही लोक कोरोनाबाबत नाहक राजकारण करत आहेत. शिवजयंती साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला, तर काही जणांनी शिवजयंतीला बंधन का आणता अशी टीका केली. पण कोरोना वाढतोय, त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. या विषयावर राजकारण करून लोकांना कुणीही भावनिक करू नये. तसेच, कुणीही मास्क घालत नाही हे अत्यंत घातक आहे. याची आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे.” असेही त्यांनी म्हंटले आहे. त्याचबरोबर, कोरोनावर कोणीही राजकारण करू नये, असंही अजित पवार म्हणालेत.

दरम्यान, अजित पवार उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असून, या बैठकीत कोरोनासंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. ग्रामस्थ आणि नागरिक मास्क वापरत नाहीत. त्यामुळे उद्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोरोनासंदर्भात कठोर निर्णय कदाचित घ्यावे लागतील, असा इशाराही अजित पवारांनी दिलाय. कोरोना पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांना नियमावली लावली पाहिजे, मी मुंबईला गेल्यानंतर राज्य प्रमुखांशी बोलून तातडीने निर्णय घेऊ. असंही अजित पवारांनी सांगितलंय.