प्रिया बापट आणि उमेश कामत यांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट

प्रिया बापट आणि उमेश कामत यांना कोरोनाची लागण

कोरोना विषाणूचा संसर्ग आता अतिशय वेगानं फैलावू लागला आहे. फेरीवाल्यापासून ते मोठमोठ्या राजकीय नेत्यानाही कोरोनाची लागण झाल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्याचे बोलले जात आहे. अशातच बॉलीवूड कलाकारांनंतर आता मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय जोडी असलेले अभिनेत्री प्रिया बापट आणि तिचा पती, अभिनेता उमेश कामत याही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

‘दुर्दैवानं उमेश आणि मला कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही स्वगृहीच विलगीकरणात आहोत. गरजेची सर्व औषधं आणि आवश्यक ती काळजी आम्ही घेत आहोत. सर्व नियमांचं पालनही करत आहोत. कृपया मागील आठवड्यात आमच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करा किंवा काही दिवस विलगीकरणात राहा’, असं आवाहन या दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं.

उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी नुकतीच आणि काय हवे या वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरूवात केली होती. ही माहिती खुद्द त्यांनीच सोशल मीडियावर दिली होती. याव्यतिरिक्त ‘दादा एक गुड न्यूज आहे’, या नाटकाच्या प्रयोगासाठीही त्यांचे दौरे सुरु होते. प्रिया आणि उमेशला कोरोनाची लागण झाल्याचं कळताच चाहत्यांनीही या जोडीला प्रतिक्रियांच्या माध्यामातून त्यांचं प्रेम देत त्यांच्यापोटी काळजीही व्यक्त केली आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांत बॉलिवूडच्या बऱ्याच सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाल्याचे दिसत आहेत. अभिनेता रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी, मनोज वाजपेयी, आशिष विद्यार्थी आणि तारा सुतारिया यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहे.