दिलासादायक ! कोरोना लशीचा तुटवडा दूर होणार
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! कोरोना लशीचा तुटवडा दूर होणार

मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असला तरी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. पण सध्या देशात फक्त दोनच लशी उपलब्ध आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह काही राज्यात लशीचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे केंद्र सरकारने आता विदेशी कोरोना लशींना आपात्कालीन मंजुरी द्यायला सुरुवात केली आहे. त्यापैकी रशियाची स्पुनिक V कोरोना लस या महिन्यात भारतात आणली जाणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हैद्राबादमधील डॉ. रेड्डीने रशियाशी स्पुनिक V लशीबाबत करार केला आहे. डॉ. रेड्डी कंपनी एप्रिल ते जूनदरम्यान ही लस रशियातून भारतात आयात करणार आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडमार्फत भारताला 250 दशलक्ष डोस दिले जाणार आहे. या लशीची भारतात किती किंमत असणार माहिती नाही. पुढील आठवड्यात ही किंमत ठरेल.

रशियाच्या राजधानीचं शहर असलेल्या मॉस्कोमधल्या गामालेय नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिऑलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी या संस्थेने स्पुतनिक V ही लस विकसित केली आहे. मानवात सर्दीसाठी कारणीभूत असलेल्या दोन विषाणूंचा वापर या लशीत करण्यात आला आहे. स्पुतनिक V ही लस कोरोनाप्रतिबंधासाठी 91.5 टक्के प्रभावी असल्याचं आढळलं आहे. स्पुतनिक V ही लस दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमानाला साठवून ठेवावी लागते. याचाच अर्थ असा की नेहमीच्या रेफ्रिजरेटरमध्ये ती साठवता येऊ शकते. तिच्यासाठी अतिरिक्त कोल्ड-चेन इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता नाही. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लशींप्रमाणेच स्पुतनिक-V या लशीचेही दोन डोस घेणं आवश्यक आहे. फक्त या लशीच्या दोन डोसमध्ये 21 दिवसांचं अंतर असणं आवश्यक आहे.