जळगावात भाजपला मोठा झटका; गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची सत्ता
राजकारण

जळगावात भाजपला मोठा झटका; गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची सत्ता

जळगाव : भाजप नेते गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये पक्षाला मोठा धक्का बसला आहे. जळगावमध्ये सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती पहायला मिळाली असून महापालिकेत भाजपाच्या सत्तेला सुरूंग लावण्यात शिवसेनेला यश मिळालं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

२७ नगरसेवक फुटल्याने मोठा धक्का बसलेल्या भाजपने जळगाव महापालिकेमधील सत्ता गमावली. एमआयएमच्या तीन नगरसेवकांनीही शिवसेनेलाच मतदान केलं असल्याने जळगाव पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. महापौर-उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा पराभव करत महापौरपद मिळवलं आहे. जयश्री महाजन यांनी प्रतिभा कापसे यांचा १५ मतांनी पराभव करत महापौरपदी आपलं नाव निश्‍चित केलं.

जयश्री महाजन यांना ४५ मतं मिळाली, तर प्रतिभा कापसे यांना ३० मतं मिळाली. भाजपाचे २७ नगरसेवक फुटल्याने आणि एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी देखील शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने शिवसेनेने बहुमतापेक्षाही जास्त मिळवली. उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची निवड झाली आहे. एकूण ७५ सदस्य असणाऱ्या महापालिकेत भाजपचे ५७, शिवसेनेचे १५, एमआयएमचे तीन असे संख्याबळ होते. पण जवळपास निम्मे नगरसेवक विरोधकांना जाऊन मिळाल्याने भाजपच्या सत्तेला अडीच वर्षात ग्रहण लागलं आहे.