मोफत लस देण्यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांचे महत्त्वाचे विधान; श्रीमंत लोक लस विकत घेऊ शकतात, पण गरीब…
कोरोना इम्पॅक्ट

मोफत लस देण्यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांचे महत्त्वाचे विधान; श्रीमंत लोक लस विकत घेऊ शकतात, पण गरीब…

मुंबई : श्रीमंत लोक लस विकत घेऊ शकतात. पण गरिबांवर लसीकरणाचा ५०० रुपयांचा खर्च लादणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे केंद्राकडे गरिबांना लस मोफत देण्यात यासंदर्भातील मागणी करणार आहे. जर केंद्राने तसे केले नाही. तर राज्याच्या अखत्यारीतील लोकांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही”, असं महत्त्वपूर्ण विधान करत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोफत लस देण्यासंदर्भातील संकेत दिले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तसेच, ”केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासोबत गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्स होणार आहे. यात देशातील गरिबांना मोफत लस देण्यात यावी यासाठी केंद्राने मदत करावी, अशी मागणी केली जाणार आहे. अशी माहितीही यावेळी राजेश टोपे यांनी यावेळी दिली.

राजेश टोपे म्हणाले की, ”राज्यात २ जानेवारी रोजी पुणे, नागपूर, जालना, नंदूरबारमध्ये ड्राय रन पार पडले होते. आता येत्या ८ जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात कोरोना लसीकरणाचे ‘ड्राय रन’ होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जाईल तेव्हा कुठलीही अडचण येणार नाही.

मात्र, ब्रिटनहून राज्यात आलेल्या ८ जणांमध्ये कोरोनाच्या नवा स्ट्रेन आढळून आले आहेत. कोरोनाचा नवा स्ट्रेनचा विषाणून वेगाने पसरतो, असं पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.त्यामुळे सर्वांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. पण घाबरुन जाण्याचं कोणतंही कारण नाही, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.