सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना भर चौकात फाशी दिली पाहिजे; कंगना रानौत
मनोरंजन

सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना भर चौकात फाशी दिली पाहिजे; कंगना रानौत

मुंबई : ”सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना भर चौकात फाशी दिली पाहिजे,” असे मत बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौतने व्यक्त केले आहे. सध्या भोपाळमध्ये तिच्या आगामी चित्रपट ‘धाकड’चे शूटिंग करते आहे. यावेळी तिने घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी बोलताना तिने मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर हे विधान केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना कंगना राणौत म्हणाली की, देशातील अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना जोपर्यंत भर चौकात लटकवले जात नाही, तोपर्यंत अत्याचार थांबणार नाहीत. त्या अनुषंगाने कडक कारवाई करत पाच-सहा उदाहरणे समाजासमोर ठेवली पाहिजेत.” सौदी अरबमधील कित्येक देशांत आजही बलात्कार करणाऱ्या आरोपीला भर चौकात लटकवले जाते. अशा कायद्यांची भारतालाही गरज आहे. त्यासाठी भारताच्या जुन्या कायद्यांत बदल करावा. गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी पीडितेवर असल्याने बऱ्याचदा आरोपी कायदेशीर कचाट्यातून सुटतो. त्यामुळे कायदे आणखी कडक करण्याची गरज आहे. असेही तिने म्हंटले आहे.

इतकेच नव्हे तर, यावेळी तिने उत्तरप्रदेश आणि कर्नाटक राज्यात लागू केलेल्या लव्ह जिहाद कायद्यालाही समर्थन दिले आहे. यावेळी ती म्हणाली की, लव्ह जिहाद कायदा चांगला आहे. हा कायदा केवळ त्यांच्यासाठी आहे, जे लव्ह जिहाद करतात. तसेच आंतरजातीय विवाहात धोका देणाऱ्या व्यक्तींसाठी हा कायदा आहे.

“फसवणूक करणाऱ्यांसाठी हा कायदा चांगला आहे. बर्‍याच लोकांना या कायद्याचा त्रास देखील सहन करावा लागला आहे. हा कायदा कोणत्याही आंतरजातीय विवाहांना हे लागू नाही. हा कायदा फक्त त्यांच्यासाठी लागू आहे ज्यांची प्रेम किंवा लग्नाच्या नावाखाली फसवणूक केली आहे. जे लोक आंतरजातीय विवाहाच्या नावाखाली फसवणूक करतात त्यांना अशा कायद्याद्वारे मदत केली जाईल.

दरम्यान, सध्या कंगना रनौत याच्यावर देशद्रोहाचा खटला सुरू आहे आणि या प्रकरणात तिने शुक्रवारी 8 जानेवारीला एका प्रॉडक्शनसाठी मुंबईतील वांद्रे पोलिस स्टेशन हजर झाली होती. यावेळी वांद्रे पोलिसांनी तिची दोन तास कसून चौकशी केली. पेशाने कास्टिंग डायरेक्टर असणाऱ्या मुंबईतील साहिल सय्यद नावाच्या व्यक्तीने वांद्रे कोर्टात कंगनाच्या विरोधात देशद्रोह, धार्मिक तेढ वाढवणे, समाजात द्वेष निर्माण करणे या आरोपाखाली एक याचिका दाखल केली होत. यात अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर कंगनाने समाजात तेढ निर्माण होईल, असे काही ट्वीट केले होते असे तिच्याविरोधातील याचिकेत म्हटले आहे.