बालाकोट एअर स्ट्राइकमध्ये ३०० दहशतवादी मारले गेले; पाकिस्तानच्या अधिकाऱ्याची कबुली
बातमी विदेश

बालाकोट एअर स्ट्राइकमध्ये ३०० दहशतवादी मारले गेले; पाकिस्तानच्या अधिकाऱ्याची कबुली

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये ३०० दहशतवादी मारले गेले, अशी माहिती आगा हिलाली या पाकिस्तानच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याने दिली आहे. एका मुलाखतीत त्याने ही माहिती दिली आहे. मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या दाव्यापेक्षा हिलाली यांनी दिलेली माहिती पूर्णतः उलट आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी थेट बालाकोटमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक केला होता. या हल्ल्यात मोठया प्रमाणावर दहशतवादी मारले गेले. पण पाकिस्तान हे मान्य करायला तयार नाही. पण पाकिस्तानच्या आगा हिलालीने एअर स्ट्राइकमध्ये झालेल्या नुकसानीची कबुली दिली आहे.

पाकिस्तानी उर्दू चॅनलवर बोलताना आगा हिलाली यांनी हे सांगितले की, “भारताने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून युद्धाची कृती केली. ज्यात ३०० जण ठार झाले. त्यांच्या लक्ष्यापेक्षा आपले लक्ष्य वेगळे होते. आपण त्यांच्या हाय कमांडला लक्ष्य केले.

यात बालाकोट एअर स्ट्राइकमध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं होतं. पण त्याचे ठोस पुरावे न दिसल्यामुळे अनेकांनी एअर स्ट्राइकच्या यशाबद्दल शंका घेतली होती. खरंतर बालाकोटमध्ये भारतीय फायटर विमानं आपल्या लक्ष्यापासून चुकण्याची शक्यता अत्यंत धुसर होती. कारण भारतीय हवाई दलाने ‘स्पाइस २०००’ बॉम्बचा वापर केला होता.