जगण्यासाठी त्यांचा संघर्ष; पेन्शनचा ट्रेलर एकदा पाहाच
मनोरंजन

जगण्यासाठी त्यांचा संघर्ष; पेन्शनचा ट्रेलर एकदा पाहाच

मुंबई : आयुष्य जगत असताना संघर्ष हा कोणालाही चुकलेला नाही. कमी पैशांमध्ये घर चालवणं, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरातील वयस्क व्यक्तींच्या आजारपणाचा खर्च हे सारं काही करताना घरच्या मूळ कमवत्या व्यक्तीची मात्र दमछाक होते. या सगळ्या परिस्थितीचं चित्रण पेन्शन या मराठी चित्रपटात उलगडण्यात आलं आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून तो चांगलाच व्हायरल होत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पेन्शन या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सुमीत गुट्टे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले असून प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून त्यांच्या भूमिकांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. पेन्शन ही इंद्र नावाच्या मुलाची अतिशय विलोभनीय कथा आहे. यात त्याचा लहानपणापासून ते तरुणपणापर्यंतचा प्रवास दाखवला जाणार आहे. पेन्शन ही आयुष्याबद्दलची एक मार्मिक कथा आहे. प्रत्येक सीन विचारपूर्वक आणि संवेदनशीलतेने या चित्रपटात चित्रित करण्यात आला आहे.

youtube.com/watch?v=_a3uIGI42MA

ही एक भावस्पर्शी कहाणी आहे जी आपल्याला साधेपणा आणि निरागसतेचे मूल्य प्रभावीपणे सांगते. मी सर्वात अर्थपूर्ण प्रकल्पांपैकी एकाचा भाग आहे, हे मी माझे भाग्य समजते, असं सोनाली कुलकर्णीने सांगितले आहे. दरम्यान, या चित्रपटाची निर्मिती इरॉस नाऊ करत असून चित्रपटाचं दिग्दर्शन पुंडलिक धुमाळ करत आहेत. हा चित्रपट येत्या २४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.