भीषण अपघातात अभिनेत्री गंभीर जखमी; मैत्रिणीचा जागीच मृत्यू
मनोरंजन

भीषण अपघातात अभिनेत्री गंभीर जखमी; मैत्रिणीचा जागीच मृत्यू

मुंबई : बिग बॉस तमिळमधून लोकप्रियता मिळणारी दाक्षिणात्य अभिनेत्री याशिका आनंद हिचा कार अपघात झाला. ती आपल्या मित्र-मैत्रिणीबरोबर एक ट्रिपवर निघाली होती. या दरम्यान महाबलीपुरम इथल्या ईस्ट कोस्ट रोड इथे त्यांची कार रस्त्यावरील डिव्हाडरला धडकली आणि रस्त्यावरील एक खड्ड्यात जाऊन कोसळली. या कारमध्ये एकूण चार जण होते. यात तिची मैत्रिण वल्लिचेट्टी भवानी हिचा जागीच मृत्यू झालाय. तर याशिका गंभीररित्या जखमी झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एक एसयूवी कार रात्रीच्या वेळी ओवरस्पीडमध्ये जाताना पाहून ईस्ट कोस्ट रोड वरील प्रत्येक जणच आश्चर्य झाले. अशाच त्यांची कार रस्त्यावरील डिव्हाडरला धडकली आणि रस्त्यावरील एक खड्ड्यात जाऊन कोसळली. खड्ड्यात कोसळलेली कार पाहून तिथल्या नागरिकांनी कारमध्ये तीन जण अडकलेले पाहून त्यांना बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले. यात तीघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघातात याशिकाची मैत्रिण वल्लीचेट्टी भवानीला वाचण्यासाठी नागरिकांना पोलिस अधिकाऱ्यांची प्रतिक्षा करावी लागली. वल्लीचेट्टी भवानी ही कारमध्ये फसली होती आणि मदतीच्या प्रतिक्षेतच तिने कारमध्येच अखेरचा श्वास घेतला.

या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी वल्लीचेट्टी भवानीचा मृतदेह शवविच्छेनासाठी चेंगलपेट रूग्णालयात पाठवण्यात आलाय. या घटनेत ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह शक्यता पोलिसांनी वर्तवलीय. पण गुन्हा दाखल करण्यापूर्वी आधी डॉक्टरांच्या रिपोर्टची प्रतिक्षा असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.