कोरिओग्राफर गणेश आचार्यने ९८ किलो वजन कमी केले;  सांगितला फॅट टू फिट’चा प्रवास
मनोरंजन

कोरिओग्राफर गणेश आचार्यने ९८ किलो वजन कमी केले; सांगितला फॅट टू फिट’चा प्रवास

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलेब्रिटी आहेत जे आपल्या फॅट टू फिट जर्नीने सर्वांना चकित करतात. आपल्याला नेहमीच जाडजूड दिसणारे सेलिब्रिटी अचानक सुंदर आणि फिट दिसायला लागले की त्याच्या सर्वच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही. असाच फॅट टू फिटचा प्रवास कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बॉलिवूड कोरिओग्राफर गणेश आचार्य पहिल्यांदा बराच जाडा होता. जवळपास तो २०० किलो वजनाचा होता. इतकं वजन असूनही तो अगदी सहजतेने नृत्य दिग्दर्शन करायचा. अथक मेहनत आणि समर्पणाने आता गणेशने जवळपास ९८ किलो वजन कमी केलं आहे. गणेश आचार्य नुकतेच द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये त्याच्यासोबत गीता कपूर आणि टेरेंस यांनीदेखील हजेरी लावली. या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी या भागाचा प्रोमो शेअर केला आहे, जो प्रचंड व्हायरल होत आहे.

कपिल शर्माच्या या शो’मध्ये गणेश आचार्यने आपल्या फॅट टू फिट प्रवासच उलगडा केला. यावेळी कपिल शर्माने त्याला किती किलो वजन कमी केलं असा प्रश्न विचारला असता गणेशने ९८ किलो वजन कमी केल्याचे उत्तर दिले. गणेश आचार्य म्हणाला की, मी २०१७ पासून वजन कमी करण्याच्या प्रवासाला सुरुवात केली. एवढं वजन कमी करताना खूप अडचणींचा सामना करावा लावला. माझ्यासाठी हे खूप कठीण होते. मी गेल्या दीड वर्षापासून माझ्या शरीरावर काम करत आहे, असेही त्याने सांगितले.

यावर कपिलने त्याची थट्टा उडवताना म्हटलं की छोट्या शहरांमध्ये पुरुष ४६ ते ६६ किलो वजनाचे असतात. मग तसं पाहायला गेलं तर तुम्ही दोन माणसं गायब केली. गणेशसोबतच गीता कपूर आणि टेरेंस लुईसही कपिलच्या कार्यक्रमात उपस्थित होते. कपिलचा हा किस्सा ऐकून तेही मनमुरादपणे हसले.

गणेशने २०१७ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं की, ‘२०१५ मध्ये आलेल्या ‘हे ब्रो’ सिनेमासाठी मी २० ते २५ किलो वजन वाढवलही होतं. तेव्हा माझं वजन २०० किलोपर्यंत गेलं होतं. पण आता माझं वजन कमी होत आहे. वजन कमी झाल्यानंतरचा लुक गणेशला स्वतःलाच आवडला आहे. आता त्याची उर्जा दुपटीने वाढली आहे. आता तो बराचवेळ व्यायामही करतो.