आमिरपाठोपाठ थ्री इडियट्सच्या या अभिनेत्याला कोरोनाची लागण
मनोरंजन

आमिरपाठोपाठ थ्री इडियट्सच्या या अभिनेत्याला कोरोनाची लागण

मुंबई : बुधवारी बॉलिवूड अभिनेता आमिर खानला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आमिर खान क्वारंटाइन झाला असून, त्याच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला होता. आता आमिर पाठोपाठ थ्री इडियट्समधील सहाय्यक अभिनेता आर माधवनला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आली असून त्याने स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आर माधवनने ट्विटर अकाऊंटवर ३ इडियट्स या चित्रपटातील एक पोस्टर शेअर केले आहे. फरहानने नेहमीच रँचोला फॉलो केले आहे आणि व्हायरस नेहमी आमच्या मागेच असतो. पण त्याने आम्हा दोघांनाही पकडले आहे. पण ऑल इज वेल आणि आम्ही लकरच बरे होऊ. ही अशी जागा आहे जिकडे राजू पोहोचू नये असे आम्हाला वाटते या आशयाचे ट्वीट आर माधवनने केले आहे.

आमिर खानला करोनाचा संसर्ग झाला आहे. तो आता होम क्वारंटाइनमध्ये असून, त्याची प्रकृती उत्तम आहे. तसेच सर्व नियमांचं पालन करत आहे. आमिर खानच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून चाचणी करून घ्यावी, असे आमिरच्या प्रवक्त्याने म्हटले होते. भारतात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना प्रशासनाकडून काही ठिकाणी खबरदारीचा पर्याय म्हणून लॉकडाऊन करण्याचा पर्याय निवडण्यात येत आहे.