रश्मिकाने केली मानधनात वाढ; अमिताभ बच्चनसोबत काम करण्यासाठी घेणार इतके कोटी
मनोरंजन

रश्मिकाने केली मानधनात वाढ; अमिताभ बच्चनसोबत काम करण्यासाठी घेणार इतके कोटी

चेन्नई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र, रश्मिकाने तिच्या मानधनात वाढ केली असून बिग बींसोबत काम करण्यासाठी ती चांगलं मोठं मानधन घेतल्याचं पिंकव्हिलाच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. तिला आगामी चित्रपटात अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी रश्मिकाला मिळणार आहे. या चित्रपटासाठी रश्मिकाने तब्बल ५- ६ कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रश्मिकाचा मिशन मजनू हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने तिच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर रश्मिकाने विकास बहल यांचा डेडली हा आगामी चित्रपट साइन केला आहे. सध्या तरी विकास बहल यांच्या डेडली या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. रश्मिकापूर्वी हा चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफला ऑफर करण्यात आला होता. मात्र, काही कारणास्तव कतरिनाने या चित्रपटाला नकार दिला. त्यामुळे आता रश्मिकाला बिग बींसोबत झळकण्याची संधी मिळणार आहे.

दरम्यान, बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या रश्मिकाचं मानधन वाढल्यामुळे सध्या कलाविश्वात ही एकच चर्चा रंगली आहे. डेडली या चित्रपटात रश्मिका व बिग बींसोबत नीना गुप्तादेखील झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती रिलायन्स एंटरटेनमेंटअंतर्गत होणार आहे.