१० वर्षांपूर्वींच्या त्या ट्विटमुळे बिग बींना केले जाते आजही ट्रोल
मनोरंजन

१० वर्षांपूर्वींच्या त्या ट्विटमुळे बिग बींना केले जाते आजही ट्रोल

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांनी केलेल्या १० वर्षांपूर्वींच्या एका ट्विटवरून त्यांना आजही ट्रोल केले जाते. त्यांचे १० वर्षापूर्वीचे एक ट्विट व्हायरल होत आहे. अमिताभ यांचे व्हायरल झालेल हे ट्वीट १० वर्ष जुनं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी स्त्रीयांच्या अंतर्वस्त्राचा उल्लेख केला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आता कोणीतरी त्यांच हे १० वर्ष जुने ट्वीट शोधून व्हायरल केलं आहे. इंग्रजी भाषेमध्ये ब्रा हा शब्द एकवचनी तर पॅण्टी हा शब्द अनेकवचनी का आहे? असे अमिताभ यांनी त्या ट्वीटमध्ये विचारला होता. २०१० मध्ये केलेल्या या ट्वीटमुळे बिग बींना आजही नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, तुमच्या सारख्या व्यक्तीला हा प्रश्न विचारणे शोभत नाही. असे अनेक ट्वीट करत नेटकऱ्यांनी अमिताभ यांना ट्रोल केले आहे.

दरम्यान, अमिताभ बच्चन हे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या सोबत ब्रम्हास्त्र या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यानंतर शहर आणि झुंड या चित्रपटात बिग बी भूमिका साकारणार आहेत.