तापसीचा येतोय रहस्यमय चित्रपट; टीझर प्रदर्शित
मनोरंजन

तापसीचा येतोय रहस्यमय चित्रपट; टीझर प्रदर्शित

मुंबई : दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यपने त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. दोबारा असं या सिनेमाचं नाव असून तापसी पन्नूची या सिनेमात मुख्य भूमिका आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून तो अनुराग कश्यप आणि तापसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अत्यंत रहस्यमय आणि उत्सुकता ताणणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर करत आहे. प्रदर्शित झालेल्या टीझरवरुनच हा सिनेमा थ्रीलर असल्याचं लक्षात येतं आहे. या ब्रम्हांडाच्या काळचक्रात तुम्ही प्रवास करता तेव्हा काय घडतं पहा असं म्हणत अनुराग कश्यपने टीझर शेअर केला आहे. टीझरवरुन हा सिनेमा टाईम ट्रॅव्हलवर आधारित असेल याचा अंदाज येतो. या सिनेमाच्या टीझरमध्ये तापसीसोबत अनुराग कश्यपही पाहायला मिळत आहे. तापसी पन्नूच्या खोलीतील टीव्हीत अनुराग अचानक प्रकट होतो आणि तिच्याशी संवाद साधतो.

त्यांच्यातील रहस्यपूर्ण संवादावरुनच अनेकांची उत्सुकती ताणली गेली आहे. एकता कपूरनेही या सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. बदला या सिनेमानंतर तापसीचा हा दुसरा रहस्यमय सिनेमा आहे. तर रहस्यमय सिनेमा करणं मला कायम आवडतं असल्याचं तापसीनं म्हंटलं आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये दोबारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.