प्रभासच्या राधे श्यामचं नवं पोस्टर रिलीज; प्रदर्शनाची तारीखही ठरली
मनोरंजन

प्रभासच्या राधे श्यामचं नवं पोस्टर रिलीज; प्रदर्शनाची तारीखही ठरली

मुंबई : बाहुबली फेम अभिनेता प्रभासचा राधे श्याम सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर या सिनेमाचं एक नवं पोस्टर रिलीज करण्यात आलंय. भगवान शिव-पार्वती यांच्या अजरामर प्रेमकहाणीचं स्मरण करण्याच्या हेतूने हे पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राधे श्यामच्या नव्या पोस्टरमध्ये प्रभास आणि पूजा हेगडे बर्फावर पहुडल्याचं दिसतंय. प्रभासने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे पोस्टर शेअर केलं आहे. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर राधे श्यामचं नवं पोस्टर शेअर करताना आनंद होतोय. असं कॅप्शन प्रभासने या फोटोला दिलं आहे. व्हेलेंटाईन डे ला या सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. या सिनेमात प्रभास सोबत अभिनेत्री पूजा हेगडे झळकणार आहे.

इटली आणि रोममध्ये या सिनेमाचं चित्रिकरण करण्यात आलं असून राधे श्याममध्ये रोमॅण्टिक ड्रामा पाहायला मिळणार आहे. हिंदीसोबत हा सिनेमा कन्नड, मल्याळी, इंग्रजी आणि तेलगू अशा विविध भाषांमध्ये रिलीज होणार आहे. बिग बजेट असणाऱ्या या सिनेमात एकट्या प्रभासच्या वेषभूषेवर तब्बल 6 कोटी खर्च करण्यात आले आहेत. राधा कृष्ण कुमार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 30 जुलैला हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. प्रभाससोबत या सिनेमात सचिन खेडेकर, प्रियदर्शी, भाग्यश्री यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळतील.