फुकरे चित्रपटातील अभिनेत्याचं निधन; फरहान अख्तरकडून दुःख व्यक्त
मनोरंजन

फुकरे चित्रपटातील अभिनेत्याचं निधन; फरहान अख्तरकडून दुःख व्यक्त

मुंबई : बॉलिवूड अभिनेता ओलानोकियोटन गॉलाबो ल्यूकस याचं निधन झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो आजारी होता. शनिवारी रात्री उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. फुकरे या चित्रपटामुळे ओलानोकियोटन खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला होता. या चित्रपटात त्याने बॉबी ही महत्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याने केलेल्या अभिनयाची प्रचंड स्तुती करण्यात आली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

फरहान अख्तरनं ट्विटच्या माध्यमातून त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. एक गुणी कलाकार आज आपण गमावला. ओलानोकियोटन तुझी कायम आठवण येत राहील. अशा आशयाचं ट्विट करुन त्याने आपलं दु:ख व्यक्त केलं. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

ओलानोकियोटनच्या निधनामुळे बॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. फरहान अख्तरसह अनेक नामांकित कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.