पॉर्नस्टार ते सुपरस्टार, शकीला ट्रेलर झाला रिलीज
मनोरंजन

पॉर्नस्टार ते सुपरस्टार, शकीला ट्रेलर झाला रिलीज

मुंबई : शकीला चित्रपटाछा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून ट्रेलरची सुरुवात ही सिल्क नावाच्या अभिनेत्रीने आत्महत्या केल्याचे दाखवल्याने झाली आहे. तिच्या निधनानंतर तिची जागा पॉर्न स्टार शकीला घेते. त्यानंतर तिची ओळख पंकज त्रिपाठीशी होते. पंकज त्रिपाठी हे चित्रपटात एक यशस्वी अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. पॉर्न स्टार ते सुपरस्टार असा शकीलाचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. हा २ मिनिटे ३९ सेकंदाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शकीला चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे. पंकज त्रिपाठी एक यशस्वी अभिनेत्याची भूमिका चित्रपटात साकारणार आहेत तर रिचा चड्ढा शकीलाच्या भूमिकेत दिसणार आहे.

कोण होती शकीला?
९० च्या दशकात शकीला ही अतिशय लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने २५०हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. शकीलाचे प्रचंड चाहते होते. तिचा चित्रपट ज्या दिवशी प्रदर्शित होणार त्यादिवशी इतर अभिनेते त्यांचे चित्रपट प्रदर्शित करणे टाळायचे.

इंद्रजीत लंकेश हे शकीला या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता पंकज त्रिपाठी शकीला या मुख्य कलाकाराच्या भूमिकेत आहेत.