बजरंगी भाईजानमधील मुन्नीचा सलमानच्या गाण्यावर डान्स; व्हिडिओ पाहाच
मनोरंजन

बजरंगी भाईजानमधील मुन्नीचा सलमानच्या गाण्यावर डान्स; व्हिडिओ पाहाच

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या बजरंगी भाईजान चित्रपटातील मुन्नीच्या डान्सचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी बालकलाकार हर्षाली मल्होत्राने अनेकांची मने चित्रपटात जिंकली होती. निरागस चेहरा आणि चेहऱ्यावर असलेले स्मित हास्य आजही प्रेक्षकांना भुरळ घालते. सध्या सोशल मीडियावर हर्षालीचा हा डान्स व्हिडीओ चर्चेत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हर्षालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सलमान खानच्या राधे चित्रपटातील सीटी मार गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने जीन्स आणि टॉप परिधान केला असून ती अतिशय क्यूट दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा हा डान्स व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकजण त्यावर कमेंट करताना दिसत आहेत.

https://twitter.com/echawadimedia/status/1393171187060989955

बजरंगी भाईजान या चित्रपटात हर्षालीने पाकिस्तानी मुलगी मुन्नीची भूमिका साकारली होती. बजरंगी भाईजान या चित्रपटात झळकण्यापूर्वी हर्षालीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ती कुबूल है, लौट आओ तृषा आणि सावधान इंडिया या मालिकेत दिसली होती.