केंद्र सरकारचा मोठा निर्णय; चित्रपटगृह, नाट्यगृहांना दिलासा
मनोरंजन

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; चित्रपटगृह, नाट्यगृहांना दिलासा

नवी दिल्ली : कोरोनामुळे लावण्यात आलेले बंधने हळहळू कमी करण्यात येत आहे. गेल्या काही दिवासांपासून चित्रगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे ५० टक्के प्रेक्षक क्षमतेच्या मर्यादेने सुरु होती. पण आता केंद्र सरकारने प्रेक्षकांच्या क्षमतेवर लावण्यात आलेला निर्बंध हटवण्यात आले आहेत. चित्रगृहे, मल्टिप्लेक्स, नाटयगृहांसाठी आता १०० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यास परवानगी दिली आहे. १ फेब्रुवारीपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आता चित्रगृहे, मल्टिप्लेक्स, नाटयगृहांमध्ये १०० टक्के प्रेक्षक हजर राहू शकतात. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून याबाबत एसओपी जाहीर करण्यात आला आहे असे म्हटले आहे.

एसओपी जाहीर करत निर्देश दिले की, कंटेन्मेंट झोनमध्ये चित्रपटगृहे बंद राहणार आहेत. प्रेक्षकांच्या सुरक्षिततेसाठी चित्रपटगृहांमध्ये एण्ट्री करण्यापूर्वी प्रेत्येक व्यक्तीचे शरीर तापमान पाहिले जाणार आहे. तसेच चित्रपटगृहामध्ये मास्क लावणे अनिवार्य आहे. सोशल डिस्टंसिंगची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात चित्रगृहे, मल्टिप्लेक्स, नाटय़गृहे ५० टक्के प्रेक्षक क्षमतेच्या मर्यादेत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती.