चिरंजीवीच्या आचार्यचा टीझर प्रदर्शित; एकदा पाहाच
मनोरंजन

चिरंजीवीच्या आचार्यचा टीझर प्रदर्शित; एकदा पाहाच

मुंबई : चिरंजीवीच्या आचार्य या आगामी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विशेष म्हणजे हा टीझर कमी कालावधीत तुफान व्हायरल झाला आहे. प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये चिरंजीवी दमदार भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे. यात चिरंजीवी काही साहसदृश्य करताना दिसत आहे. इतकंच नाही तर या चित्रपटात चिरंजीवीसोबत त्याचा मुलगा रामचरण आणि अभिनेत्री काजल अग्रवालदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांच्या यादीत अभिनेता चिरंजीवीचं नाव आवर्जुन घेतलं जातं. तेलुगू, तामिळ आणि कन्नड या चित्रपटांमध्ये काम केलेल्या चिरंजीवीचा आज एक स्वतंत्र असा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्याच्या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन कोरताल शिव करत असून निर्मिती रामचरण आणि निरंजन रेड्डी यांनी केली आहे. हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

युट्यूबवर हा टीझर ट्रेण्ड होत असून आता तो पाचव्या क्रमांकावर आहे. कोनीडेला प्रोडक्शन कंपनीच्या यूट्यूबवर आतापर्यंत हा टीझर 75 लाख 84 हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.