दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांना आशिया खंडातला प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर
मनोरंजन

दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांना आशिया खंडातला प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर

‘स्थलपुराण’ या चित्रपटासाठी आशिया खंडाचा अकॅडमी अवॉर्ड अशी ओळख असलेला ‘यंग सिनेमा अवॉर्ड’ हा पुरस्कार यावर्षी मराठी दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांना जाहीर झाला आहे. फिल्म जगतातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. ‘स्थलपुराण’ या चित्रपटातील विशेष दिग्दर्शकीय कामगिरी साठी अक्षय इंडीकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात केले जाणे आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ऑस्ट्रेलियातील ‘आशिया पॅसेफिक स्क्रीन अकॅडमी’, ‘ग्रिफिथ स्कूल’ आणि ‘युनेस्को’ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी अक्षय इंडीकर यांना मिळालेला हा बहुमान ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे. आता हा पुरस्कार अक्षय इंडीकर यांना मिळणार असल्याने सर्वांना आनंद होत आहे. आशिया पॅसिफिक विभागातील सुमारे ७० देशांमधून या पुरस्कारासाठी एकाची निवड केली जाते. आजतायगत सुमारे ३००० सिनेमे या पुरस्काराच्या स्पर्धेत उतरले आहेत.

इंस्टाग्राम एक पोस्ट शेअर अक्षय इंडीकर यांनी या पुरस्कारासाठी आनंद व्यक्त केला आहे. ”मला सांगायला अतिशय आनंद होतोय आणि मला अजूनही विश्वास बसत नाही आहे की आशिया खंडातील सर्वोच्च असा एशिया पॅसिफिक यंग सिनेमा अवॉर्ड हा पुरस्कार एशियन सिनेमातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो. सत्तर देशातून एका फिल्ममेकरला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. आशियाचे ऑस्कर असा मानला जाणारा हा पुरस्कार ऑस्ट्रेलिया येथील ग्रीफिथ फिल्म स्कुल, युनिस्को आणि आशिया पॅसिफिक स्क्रीन अकॅडमी यांच्या वतीने दिला जातो आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे यांची मानद मेंबरशिप सुद्धा मला प्राप्त झाली आहे.”

अनेक कारणांनी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या पुरस्काराची काही प्रमूख वैशिष्ट्ये देखील आहेत. ती म्हणजे, या पुरस्कार विजेत्याला पुरस्कारासोबत आशिया पॅसिफिक स्क्रीन अकॅडमीची मिळणारी सन्माननीय सदस्यता. तसेच हा विजेता, सिनेमा निर्मितीसाठी अकॅडमीकडून मिळणाऱ्या निधीसाठी देखील पात्र ठरतो. भारतातून आतापर्यंत असघर फरादी, बॉग्न जून हो, मनोज बाजपेयी, राजकुमार राव, नवाजुद्दीन सिद्दकी यांच्यासारख्या सिनेक्षेत्रात काही वेगळं करून दाखवणाऱ्या कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.