‘ढिशक्याव’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस; पाठमोऱ्या पोस्टरचे लवकरच उलगडणार गुपित
मनोरंजन

‘ढिशक्याव’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस; पाठमोऱ्या पोस्टरचे लवकरच उलगडणार गुपित

लॉकडाऊन नंतर रुळावर येणाऱ्या चित्रपटसृष्टीने पुन्हा एकदा चांगलाच जोर धरला आहे. आता लवकरच दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांचा ‘ढिशक्याव’ चित्रपट विनोदी आणि विसंगत प्रकारची कथा घेऊन हा चित्रपट सिनेसृष्टीत रुजू होण्यास सज्ज झाला आहे. विनोदासह या चित्रपटाच्या कथेला रोमँटिक कथेची जोड मिळाली आहे. विनोद आणि प्रेम याचे उत्तम समीकरण साधणारा आणि नाद या शब्दाला धरून कथानक रंगवणाऱ्या या चित्रपटाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहता पोस्टर मध्ये उभी असलेली सुंदर, अदाकारी अभिनेत्री आणि बंदूकीसह पोस्टर मध्ये दाखवण्यात आलेला हात नक्की कोणत्या कलाकारांचा आहे हे गुपित भंडावून सोडणारे आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

निर्माते मोहम्मद देशमुख, उमेश विठ्ठल मोहळकर यांनी निर्मित केला आहे. याशिवाय दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांची ही निर्मिती असून राजीव पाटील, सुनील सूर्यवंशी आणि उमाकांत बरदापुरे यांची सह निर्मिती असलेला हा विषयघन चित्रपट आहे. प्रीतम एस के पाटील यांनी दिग्दर्शक आणि निर्मिता अशी दुहेरी कामगिरी या चित्रपटासाठी बजावली आहे. दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांच्या खिचीक, डॉक्टर डॉक्टर आणि जिऊ या तीन महत्वपूर्ण चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर त्यांचा हा चौथा सिनेमा रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चित्रपटाची कथा लेखक संजय नवगिरे लिखित आहे.

‘ढिशक्याव’ चित्रपटाच्या पोस्टर लाँचनंतर कलाकारांची उत्सुकता लागून राहिली आहे. नेमके कोणते कलाकार या चित्रपटात झळकणार, ते कोणती भूमिका साकारणार याकडे प्रेक्षकांच्या लक्ष लागले आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहता लागलेली उत्कंठा नक्कीच खुर्चीत खिळवून ठेवणारी आहे.