कंगना रानौत म्हणते; मेरी राख गंगा में मत बहाना…
मनोरंजन

कंगना रानौत म्हणते; मेरी राख गंगा में मत बहाना…

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ती प्रत्येक विषयावर आपले मत देण्यास कधीही मागेपुढे पाहत नाही. आता पुन्हा एकदा कंगना चर्चेत आली आहे. खरतरं, कंगना राणौत केवळ तिच्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत असते असे वाटत असेल तर हे नक्कीच चूक आहे. याचे कारण म्हणजे कंगना अलीकडेच तिच्या कुटुंबीयांसह हायकिंगला गेली होती. याठिकाणी असलेल्या वातावरणातून तिने प्रेरणा घेत एक कविता लिहिली आहे. कवितेतून कंगनाने तिच्या चाहत्यांना आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हायकिंगला गेल्यानंतर तिने त्याठिकाणी केलेली ‘राख’ ही कविता चांगली चर्चेत आहे. या कवितेचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला असून तो जबरदस्त व्हायरल होतोय. या कवितेत ती म्हणत आहे की, ‘मेरी राख गंगा में मत बहाना। हर नदी सागर के साथ जाकर मिलती है। मुझे सागर की गहराइयों से डर लगता है। मैं आसमान को छूना चाहती हूं। मेरी राख को पहाड़ों पर बिखेर देना…’, असे कंगनाने लिहिलेल्या कवितेच्या ओळी आहेत.

दरम्यान, कंगनाने फॅमिली ट्रिपची छायाचित्रे ट्विटरवर शेअर केली आहेत. या फोटोमध्ये कंगना, तिची बहीण रांगोली, भाची रितू आणि पुतणे पृथ्वी याच्यासोबत दिसत आहे. कंगनाने फोटो शेअर करताना लिहिले आहे, काल ती कुटुंबासह हायकिंगला गेली होती. तो एक चांगला अनुभव होता. माझी वाहिनी एक इन्स्टाग्राम क्वीन आहे. त्यांना सर्व फिल्टर माहित आहेत. ते कसे वापरायचे ते त्यांनी मला सांगितले. कंगना रानौत सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. शेतकरी आंदोलनाविरोधात तिने अनेक ट्वीट केले होते. या दरम्यान तिचे गायक-अभिनेते दिलजित दोसांझ यांच्या ट्विटरवर युद्ध पाहायला मिळाले.

तथापि, यापूर्वी कंगनाने ‘आसमान’ नावाची कविता लिहिली होती. कंगना एक उत्तम अभिनेत्री तर आहेच. पण एक उत्तम कवयित्री सुद्धा आहे, हेच तिच्या या कवितांवरून दिसतेय. सध्या चाहते तिचे कौतुक करताना थकत नाहीयेत. कंगना राणौतने नुकतेच ‘थलाइवी’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. आता ती धाकड चित्रपटात दिसणार आहे आणि सध्या ती या चित्रपटाच्या तयारीत व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वी तिने एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात ती धाकड चित्रपटासाठी फिजिकली तयार होताना दिसत होती. नुकतेच तिने तिचा प्रोस्थेटिक मेजरमेंट सेशन पूर्ण केले.