RRRमधील रामचा लूक रिलीज
मनोरंजन

RRRमधील रामचा लूक रिलीज

मुंबई : बाहुबली सारख्या जगभरात गाजलेल्या सिनेमानंतर एस. एस. राजामौलींचा RRR हा सिनेमा चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. सिनेमाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये या सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. या सिनेमात राम चरण, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगण, समुथीराकिनी, ऑलिव्हिया मॉरिस असे कलाकार झळकणार आहेत. काही दिवसांपूर्वी म्हणजेच आलियाच्या वाढदिवसाचं निमित्त साधत या सिनेमातील तिचा पहिला लूक रिलीज करण्यात आला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आलियानंतर आता या सिनेमात महत्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता रामचरण तेजाचा पहिला लूक रिलीज करण्यात आला आहे. रामचरणच्या वाढदिवसाचं निमित्त साधत या सिनेमाचं एक पोस्टर रिलीज करण्यात आलं असून यात राम चरणचा लूक चाहत्यांसाठी समोर आणला आहे. अभिनेता रामचरणने सोशल मीडियावर त्याच्या सिनेमातील लूकचं पोस्टर शेअर केलं आहे.

राम चरणने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. हातात धनुष्य आणि गळ्यात रिद्राक्षांच्या मााळा, लांब केस आणि सुदृढ शरीर असा राम चरणचा फोटोमधील लूक आहे. यात त्याने शौर्य, सन्मान, प्रामाणिकपणा, एक व्यक्ती तो या सर्वांची व्याख्या सांगेल. ही भूमिका साकारायला मिळणं हे माझं भाग्य आहे. असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.