थंडीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गायक दिलजीतने केली एक कोटींची मदत
मनोरंजन

थंडीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गायक दिलजीतने केली एक कोटींची मदत

नवी दिल्ली : ”‘प्लीज, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या इतकीच आमची विनंती आहे. येथे शेतकरी शांततेत आंदोलन कतोय. संपूर्ण देश शेतकऱ्यांसोबत आहे.’ असे म्हणत पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांजने केंद्रसरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची विनंती केली. शनिवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सिंधू बॉर्डरवर पोहचला. विशेष म्हणजे यावेळी थंडीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक कोटी रुपयांची मदत केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याबाबतचा खुलासा पंजबी गायक सिंघा यांनी केला आहे. सिंघा यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओत दिलजीतने केलेल्या मदतीची माहिती दिली. तसेच आंदोलनाला पांठिबा दिल्याबद्दलही दिलजीतचे आभारही व्यक्त केले आहेत. यावेळी त्याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना थंडीपासून आराम मिळण्यासाठी स्वेटर किंवा चादर खरेदी करण्यासाठी दिलजीतनं एक कोटी रुपयांची रक्कम दिल्याचे सांगितले.

आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सिंधू बोर्डरवर गेलेल्या दिलजीत यावेळी म्हणाला की, संपूर्ण देश शेतकऱ्यांसोबत आहे. कडाक्याच्या थंडीमध्येही तुम्ही आंदोलन करत आहात. सर्व शेतकऱ्यांना माझा सलाम आहे. शेतकऱ्यांनी नवीन इतिहास लिहिला आहे. येणाऱ्या पिढीला हा इतिहास सांगितला जाईल. शेतकऱ्यांच्या अडचणी कोणीही वाढवू शकत नाही.”

दरम्यान, अभिनेत्री कंगना रणौत आणि दिलजीत दोसांज या दोघांमध्ये शेतकरी आंदोलनावरुन झालेलं ट्विटर वॉर संपूर्ण देशाला माहित आहे. शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका वृद्ध महिला आंदोलनकर्त्याविषयी कंगानानं आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. त्यावर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला होता. यावेळीही दिलजीतने कंगनाची चांगलीच खरडपट्टी काढली.

तथापि, गेल्या आठ- दहा दिवसांपासून पंजाब- हरियाणाचे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून आहेत. दिल्लीतील थंडी सर्वांनाच माहित आहे. या कडाक्याच्या थंडीतही शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात काल पाचवी चार्चेही फेरी पार पडली. मात्र यावेळीही शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघाला नाही. यामुळे  शेतकरी चांगलेच संतापले आहेत. सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर हे आंदोलन कोणती दिशा घेणार; हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.