‘तुम्ही माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना नका हो फोडू; पंकजा मुंडेंचा रोहित पवारांना टोला
मनोरंजन

‘तुम्ही माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना नका हो फोडू; पंकजा मुंडेंचा रोहित पवारांना टोला

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या हा कार्यक्रमाला प्रेक्षकांची नेहमीच पसंती असते. निखळ मनोरंजन म्हणून हा कार्यक्रम नेहमीच चर्चेत असतो. हे आपल्याला माहितीच आहे. मात्र यावेळी या कार्यक्रमाची चर्चा होण्याचे कारण काय असा प्रश्न नक्कीच पडला असेल. याचे कारणदेखील तसेच आहे. कारण थुकरटवाडीत यंदा राजकीय वारे वाहणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कारण ‘चला हवा येऊ द्या’मध्ये राज्यातील राजकीय मैदानात दोन दिग्गज कुटुंबांचा दबदबा असलेले मुंडे व पवार एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत. भाजपा नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि भाजपा खासदार सुजय विखे यांनी हजेरी लावली आहे. लवकरच हा भाग प्रदर्शित होणार आहे.

या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे आणि सुजय विखे यांच्या पत्नी धनश्रीसुद्धा सहभागी झाल्या होत्या. यावेळी या जोडप्यांमध्ये रिंग टाकून वस्तू जिंकण्याचा हा खेळ खेळण्यात आला. या खेळातील वस्तूंमध्ये घडाळ्याचाही समावेश होता. धनश्री आणि अमित यांनी रिंग टाकली असता नेमकी ती घडाळ्यावर पडली. त्यानंतर “तुम्ही माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना नका हो फोडू”, असा टोला पंकजा मुंडेंनी रोहित पवारांना लगावला.

“सुजय यांची बायको आणि माझा नवरा यांना फोडण्याचं काम रोहित करत आहेत”, असा मिश्किल टोमणा पंकजांनी मारताच रोहित पवारांनीही त्याला मजेशीर प्रत्युत्तर दिलं. “घरच्यांना माहित असतं आपल्या माणसांसाठी काय चांगलं आहे”, असं रोहित म्हणताच सेटवर एकच हशा पिकला.