सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी बांधली लग्नगाठ
मनोरंजन

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी बांधली लग्नगाठ

पुणे : पुण्यातील ढेपेवाड्यात पारंपारिक पद्धतीने मराठी कला विश्वातील अभिनेता आणि सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर आज विवाहबद्ध झाले. या विवाह सोहळ्याच्या फोटोंची सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र, आज अखेर कुटुंब आणि मित्र-परिवाराच्या साक्षीने त्यांनी लग्न केलं आहे. तर आता या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

https://www.instagram.com/p/CKa5DwVJHGb/?utm_source=ig_web_copy_link

अस्सल मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला असून मितालीने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. तर, सिद्धार्थने रॉयल ब्लू कलरचा कुर्ता आणि धोतर परिधान केलं होतं. दरम्यान, या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. यात अभिनेता उमेश कामत, अभिज्ञा भावे असे अनेक सेलिब्रिटी हजर होते.

https://www.instagram.com/p/CKa1U67Jbjk/?utm_source=ig_web_copy_link

तर, सिने गॉंसिप’ने सिद्धार्थ -मितालीच्या लग्नसोहळ्याचे काही फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत. पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या लग्नसोहळ्यात मितालीने हिरव्या रंगाची नऊवारी नेसली होती. नाकात नथ, हातात हिरवा चुळा,माथ्यावर बाशिंग अशा पोशाखात ती दिसत आहे. तसेच सप्तपदीच्या एका फोटोत मितालीच्या चेह-यावर हसू आहे.

https://www.instagram.com/p/CKaw0TeJWzH/?utm_source=ig_web_copy_link

सिद्धार्थ -मितालीच्या लग्नसोहळ्याला अभिनेता उमेश कामत, अभिज्ञा भावे, पूजा सावंत, भूषण प्रधान असे अनेक सेलिब्रिटी यावेळी हजर होते. दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा सिद्धार्थने इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्याच वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सिद्धार्थने मितालीला प्रपोज केले होते. २०१९ मध्ये सिद्धार्थ-मितालीचा साखरपुडा पार पडला. गेल्या दोन तीन दिवसांपासून त्याचे लग्नाचे अनेक विधी पार पडल्यानंतर आज अखेर त्यांनी लग्नगाठ बांधली.