कॉमेडी आणि रोमांसचा परिपूर्ण पॅकेज असलेला ‘कुली नं १’ चा ट्रेलर रिलीज
मनोरंजन

कॉमेडी आणि रोमांसचा परिपूर्ण पॅकेज असलेला ‘कुली नं १’ चा ट्रेलर रिलीज

गोविंदाच्या कुली नं १ ने नव्वदच्या दशकात धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाची लोकप्रियता प्रेक्षकांच्या मनात आजही कायम आहे. प्रेक्षकांचे पुन्हा मनोरंजन करण्यासाठी आता कुली नं १ चा रिमेक आला आहे. या रिमेकमध्ये अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चित्रपटाचा ट्रेलर कॉमेडी आणि रोमांसचा परिपूर्ण पॅकेज असल्याचं दिसून येत आहे. चित्रपटामध्ये अभिनेते परेश रावल यांनी साराच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. एक असे वडील जे आपल्या मुलीचं लग्न एका मोठ्या आणि श्रीमंत घरातील मुलासोबत करण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असतात.

ट्रेलरमधील रावल यांची भूमिका अत्यंत विनोदी असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे साराचा ग्लॅमरस अंदाज आणि वरूणचा कॉमिक टाइमिंग कमालच वाटत आहे. शिवाय सारा आणि वरूणमधील रोमाँटिक केमिस्ट्री चाहत्यांना अनुभवता येणार आहे.

‘कुली नंबर १’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच १ लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. ३ मिनिटं १५ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये वरुण धवन आणि साराची केमिस्ट्री पाहायला मिळते.

वरुणने चित्रपटाचे एक पोस्टर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. हे पोस्टर पाहता तो चित्रपटात पाच वेगवेगळे रोल करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

‘कुली नंबर १’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये सारा आणि वरुणसोबत परेश रावल, जावेद जाफरी, जॉनी लीवर, राजपाल यादव हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक डेविड धवन यांनी केले असून निर्मिती वासू भगनानीने केली आहे. हा चित्रपट २५ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.