आयपीएल सुरू होण्याआधी मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लाँच; फोटो पाहाच
क्रीडा

आयपीएल सुरू होण्याआधी मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लाँच; फोटो पाहाच

मुंबई : आयपीएलच्या १४व्या हंगामाआधीच मुंबई इंडियन्स संघाने नवी जर्सी लॉन्च केली आहे. सोशल मीडियावर मुंबईने याचा व्हिडिओ शेअर केला आहे. नव्या जर्सीच्या बॉर्डर आणि कॉलरवर नारंगी रंग वापरला आहे. ही नवी जर्सी चाहत्यांच्या पसंतीला उतरली असून त्यावर भरपूर प्रतिक्रिया देत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून विक्रमी पाचवे विजेतेपद मिळवले होते. या वर्षी देखील तेच विजेतेपदाचे मुख्य दावेदार असतील. आयपीएल २०२१ ची फायनल २९ मे रोजी होणार आहे. जर मुंबईने यावेळी देखील विजेतेपद मिळवले तर आयपीएलच्या इतिहासात सलग तीन वेळा विजेतेपद मिळवणारा तो पहिला संघ ठरेल.

येत्या ९ एप्रिलपासून आयपीएल २०२१ला सुरूवात होईल. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सवर पुन्हा एकदा सर्वांची नजर असेल. मुंबईने पाच वेळा विजेतेपद मिळवले आहे. या वर्षी आयपीएलची सुरूवात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या दोन्ही संघातील लढतीने होणार आहे. ९ एप्रिल रोजी पहिली लढत चेन्नईत होईल. या वर्षी कोणत्याच संघाला घरच्या मैदानावर सामने खेळता येणार नसल्याने मुंबई इंडियन्सला देखील वानखेडेवर खेळता येणार आही.