प्रभास करणार एनआरआय मुलीसोबत लग्न?
मनोरंजन

प्रभास करणार एनआरआय मुलीसोबत लग्न?

चेन्नई : बाहुबली फेम सुपरस्टार अभिनेता प्रभास एका एनआरआय मुलीसोबत करणार असल्याचं बॉलिवूड लाईफच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. बाहुबली हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रभास-अनुष्काच्या अफेअरची चर्चा रंगू लागली. या दोघांनी लग्न करावं अशी त्यांच्या चाहत्यांची प्रचंड इच्छा आहे. परंतु, प्रभास अनुष्कासोबत नाही तर एका एनआरआय मुलीसोबत लग्न करणार आहे. विशेष म्हणजे प्रभासचं लव्ह मॅरेज नसून अरेंज मॅरेज असल्याचं म्हटलं जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

प्रभासची होणारी पत्नी अमेरिकत वास्तव्यास असून तिचे वडील एका सॉफ्टवेअर कंपनीचे मालक आहेत. प्रभास आणि या मुलीच्या कुटुंबीयांनी चर्चा करुन हे लग्न ठरवलं आहे. तसंच प्रभासनेदेखील या लग्नाला होकार दिला आहे. प्रभासची तरुणींमध्ये त्याची विशेष क्रेझ आहे. त्यामुळे कायमच सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये त्याच्या लग्नाची चर्चा रंगत असते. अनेकदा त्याचं नाव अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबतदेखील जोडलं गेलं.

दरम्यान, प्रभास सध्या त्याच्या राधेश्याम या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत पूजा हेगडे स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार असून त्याच्यानंतर प्रभासच्या लग्नाचा बार उडणार आहे. परंतु, अद्याप प्रभास किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.