अक्षय कुमार राजकीय पक्षात प्रवेश करणार? स्वतःच दिले स्पष्टीकरण
मनोरंजन

अक्षय कुमार राजकीय पक्षात प्रवेश करणार? स्वतःच दिले स्पष्टीकरण

मुंबई : अभिनेता कुमार म्हणजेच अक्षय कुमार रविवारी कोलकातामध्ये राजकील रॅलीचा भाग होणार अशी चर्चा सुरू होती. यावरून तो राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याचेही बोलले जात होते. यावर अक्षयने आता स्पष्टीकरण दिले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कोलकातामधील राजकीय रॅलीत माझ्या उपस्थितीबद्दल अफवा पसरवल्या गेल्या याबद्दल मला आश्चर्य वाटते. मी सध्या मुंबईत शुटिंगमध्ये व्यस्त आहे, आणि कोलकाता येथील राजकीय रॅलीतील माझी उपस्थिती असेल ही बातमी अफवा आणि खोटी आहे. अक्षयने राम सेतु या त्याच्या आगामी चित्रपटाला सुरूवात केली आहे. अक्षयने स्क्रिप्ट रीडिंगचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज टीम एकत्र काम करते ती टीम नेहमीच उत्तम काम करते! चित्रपटाच्या चित्रीकरणाची प्रतिक्षा करू शकतं नाही. अशा आशयाचे कॅप्शन अक्षयने त्या फोटोला दिले आहे.

याशिवाय अक्षय कुमार सुर्यंवशी या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित होणार होता पण करोनाव्हायरस परिस्थिती आणि चित्रपटगृहे बंद पडल्यामुळे हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहे. यानंतर अक्षय अभिनेता धनुष आणि अभिनेत्री सारा अली खानसोबत ‘अतरंगी रे’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. तर अक्षय कुमारने रक्षाबंधन या चित्रपटाची घोषणा देखील केली आहे.