रिलायन्स जिओच्या ग्राहकांना 1 जानेवारीपासून मिळणार मोफत व्हॉईस कॉल
लाइफफंडा

रिलायन्स जिओच्या ग्राहकांना 1 जानेवारीपासून मिळणार मोफत व्हॉईस कॉल

नवी दिल्ली : देशातील टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने १ जानेवारीपासून सर्व लोकल व्हाईस कॉल मोफत केले आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया (ट्राय) च्या निर्देशानुसार, १ जानेवारी पासून Bill and Keep नियम लागू करण्यात येणार आहे. यामुळे सर्व राज्यांतर्गत व्हाइस कॉलवर इंटरनकनेक्ट युजेस चार्जेस (IUC) संपणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काही महिन्यांपूर्वी जिओने आपल्याच नंबरवरून दुसऱ्या कंपनीच्या मोबाईल नंबरवर कॉल केल्यासही पैसे आकारणी सुरू केली होती. त्यासाठी आयसीयू चार्जेस द्यावे लागत असल्याचे कारण दिले होते. आता आयसीयू चार्जेसच रद्द झाल्याने रिलायन्सने ही सुविधा दिली आहे. जिओच्या म्हणण्यानुसार नॉन जिओ नेटवर्कवर राज्यांतर्गत व्हाइस कॉल चार्जला पुन्हा एकदा झीरो करण्यासाठी आणि आययूसी चार्ज संपण्यासोबत जिओ ग्राहकांना पुन्हा एकदा ऑफ नेट डोमेस्टिक फ्री व्हाइस कॉलचा फायदा मिळणार आहे.

याची सुरुवात १ जानेवारी २०२१ पासून होणार आहे. जिओ नेटवर्कवर ऑन नेट डोमेस्टिक व्हाइस कॉल नेहमी फ्री राहिली आहे. रिलायन्स जिओ ने ऑक्टोबर मध्ये एकूण २.२२ मिलियन नवीन मोबाइल ग्राहक जोडले आहेत. यासोबतच कंपनीकडे एकूण सब्सक्राईबर्सची संख्या ४०६.३ मिलियनपर्यंत पोहोचली आहे. तसेच, युजर्संना केवळ ट्रायकडून आययूसी चार्ज हटवण्यापर्यंत हे चार्ज द्यावा लागणार आहे. असा विश्वास व्यक्त केला आहे.