कंगनाला रडू अनावर; घरातल्या महत्वाच्या व्यक्तीचं निधन
मनोरंजन

कंगनाला रडू अनावर; घरातल्या महत्वाच्या व्यक्तीचं निधन

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतच्या आजोबांचं निधन झालं आहे. ते ९० वर्षांचे होते. वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. कंगनाने ट्विटच्या माध्यमातून ही दु:खद बातमी सांगितली आहे. कंगनाने तिच्या आजोबांचा एक जुना फोटो ट्विटरवर शेअर करत आपण आजोबांना प्रेमानं डॅडी म्हणूनही हाक मारायचो, अशी एक आठवण सांगितली. आज संध्याकाळी मी आईवडिलांच्या घरी गेले. मागील दोन महिन्यांपासून माझ्या आजोबांची प्रकृती ठीक नव्हती. मी घरी पोहोचले, पण त्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतलेला होता. अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने आपलं दु:ख व्यक्त केलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कंगनाला या घटनेमुळे खूप दुःख झाले असून तिला रडू अनावर झाल्याचेही तिने सांगितले आहे. वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौतवर दु:खाचा डोंगर कोसळला असून तिचे चाहतेही सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे सांत्वन करताना दिसत आहेत.

दरम्यान, कंगना हृतिक रोशनमुळे चर्चेत होती. हृतिकने सायबर पोलिसांकडे केलेल्या तक्रोरीवरून नोंद गुन्ह्य़ाचा तपास गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाकडे वर्ग करण्यात आला. या वृत्तास मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला. २०१६ मध्ये हृतिकच्या नावाचा वापर करून बनावट ईमेल खाते तयार करून त्याद्वारे अभिनेत्री कंगना रणौतशी संवाद साधण्यात आल्याची तक्रार हृतिकने दाखल केली होती. त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवून सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. या घडामोडीनंतर हृतिक आणि कंगना यांनी एकमेकांविरोधात बऱ्याच तक्रारी दाखल केल्या. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप घडले.