ना कन्यादान, ना मंगलाष्टके; दियाचा आगळा वेगळा विवाहसोहळा संपन्न
मनोरंजन

ना कन्यादान, ना मंगलाष्टके; दियाचा आगळा वेगळा विवाहसोहळा संपन्न

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झा हिचा विवाहसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. आता तुम्ही म्हणाल त्यात नवीन काय? पण दियाचा विवाहसोहळा होताच विशेष, खरतर प्रत्येकाला आपलं लग्न जल्लोषात, मांडव, नातेवाईकांची गर्दी, फटाक्यांची आतिषबाजी अशा पद्धतीने धूमधडाक्यात लग्न करण्याची इच्छा असते. मात्र, या परंपरांच्या पलीकडे जाऊन प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झाने लग्न केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दिया मिर्झाचा 15 फेब्रुवारीला उद्योगपती वैभव रेखी याच्यासोबत विवाह झाला. दोघांचं हे दुसरं लग्न होतं. विशेष म्हणजे दियाच्या विवाहात अनेक पारंपरिक चालिरिती न पाळल्या नाहीत. तिच्या लग्नाच्या विधीत कन्यादानदेखील झालं नाही. याशिवाय मंगलाष्टिका किंवा इतर विधीसाठी चक्क महिला भटजी बघायला मिळाली. त्यामुळे दियाचं लग्न सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे.

या लग्नात अनेक नव्या गोष्टी बघायला मिळाल्या. त्यांनी लग्नात जुन्या परंपरांना मागे सारुन अनेक नव्या गोष्टींचं अनुकरण केलं. विशेष म्हणजे दियाच्या लग्नात कन्यादानाचा विधी पार पडला नाही. याशिवाय इतर पारंपरिक चालिरितींना न पाळता दिया पतीसोबत सासरी गेली. दियाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत.

दियाने इन्स्टाग्रामवर अकाउंटवर आपल्या विवाहासंबधीच्या काही भावना शेअर केल्या आहेत.“गेल्या 19 वर्षांपासून मी ज्या बगिच्यात प्रत्येक संध्याकाळ एकांतात वेळ घालवत होती आज त्याच ठिकाणी माझा विवाहसोहळा पार पडला. खूप साध्या आणि आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आली होती. पर्यावरण पूरक असं नियोजन करण्यात आलं होतं. सजावटीत एकही प्लॅस्टिकच्या वस्तूचा वापर करण्यात आला नव्हता”, अशी माहिती दियाने इन्स्टाग्रामवर शेअर केली. दरम्यान, वैभवची पहिली पत्नी सुनैना रेखी हीने देखील नवविवाहीत दाम्पत्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.