ट्विटरने केली कारवाई; चिडलेल्या कंगनाने दिली धमकी
मनोरंजन

ट्विटरने केली कारवाई; चिडलेल्या कंगनाने दिली धमकी

मुंबई : ट्विटरने आपल्या धोरणांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या संसदेत झालेल्या हिंसाचारानंतर ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंटही बंद केले होते. तीच वेळ ट्विटरवरुन वारंवार वादग्रस्त विधानं करणाऱ्या कंगनावर ओढवली आहे. ट्विटरने तात्पुरते निर्बंध आणल्यानंतर कंगनाने ट्विटरचे सीईओ जॅक डोर्से यांच्यावर शरसंधान साधलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कंगनानं ट्विटरवर लिहिलं की, लिबरल लोक आपले काका जॅक यांच्याकडे जाऊन रडत आहेत आणि माझ्या अकाउंटवर काही काळासाठी निर्बंध आणले आहेत. ते मला धमक्याही देत आहेत. ट्विटरवरच अकाउंट म्हणजेच माझी व्हर्चुअल ओळख देशासाठी शहीद होऊ शकते. मात्र, माझं रिलोडेड देशभक्तीचं व्हर्जन सिनेमांद्वारे पुन्हा पुन्हा परत येईल. याद्वारे तुमचं जगणंच मी अवघड बनवून ठेवेल’

दरम्यान, ट्विटरचा वापर करुन वारंवार वादग्रस्त विधानं करणाऱ्या कंगनावर ट्विटरने तात्पुरते निर्बंध आणले आहेत. यामुळे चिडलेल्या कंगनाने थेट धमकीच दिली असून तिच्याविरोधात भूमिका घेणाऱ्यांना तुमचं जगणं अवघड करणार असल्याचं तिनं म्हटलं आहे.