जातीव्यवस्थेवर अवधूत गुप्तेचं भन्नाट रॅप साँग; एकदा पाहाच
मनोरंजन

जातीव्यवस्थेवर अवधूत गुप्तेचं भन्नाट रॅप साँग; एकदा पाहाच

मुंबई : गायक, संगीत दिग्दर्शक, परीक्षक अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून समोर येणाऱ्या अवधूत गुप्तेने एक नवं कोरं रॅप साँग प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. प्रेक्षकांना नेहमीच काही तरी हटके देण्याचा प्रयत्न अवधूत करत असतो. विशेष म्हणजे यावेळी तो एक रॅप साँग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याने जाती व्यवस्थेवर अवधूत गुप्तेनं भाष्य केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अवधूतच्या या नव्या गाण्याचं नाव जात असं आहे. या गाण्यातील रॅपमधून त्याने जातीय व्यवस्थेवर आपले विचार मांडले आहे. या गाण्यातून माणुसकी हीच खरी जात आहे हा संदेश देण्यात आला आहे. संवेदनशील विषय या गाण्यातून सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या गाण्याला नेटकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या गाण्याचे गीतकार समीर सावंत आहेत. तर, संगीतकार विक्रम बाम आहेत. अवधूतचं ऐका दाजीबा, मधुबाला अशी अनेक गाणी गाजली आहेत. झेंडा, कान्हा, बॉइज, रेगे, जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, मोरया असे त्याचे अनेक चित्रपट गाजलेले आहेत.