दाक्षिणात्य अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या; मृत्यूपूर्वी लिहली सुसाईड नोट
मनोरंजन

दाक्षिणात्य अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या; मृत्यूपूर्वी लिहली सुसाईड नोट

बंगळुरू : दाक्षिणात्य अभिनेत्री सौजन्याचे निधन झाले आहे. कन्नड फिल्म इंडस्ट्रीमधील सौजन्य लोकप्रिय होती. बंगळुरू येथील राहत्या घरात गळफास घेऊन सौजन्याने आत्महत्या केली. तिने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सौजन्या बंगळरुमधील कुंबलगोडू परिसरातील एका इमारतीमध्ये राहत होती. तिने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये तिच्या आत्महत्येस कुणीही जबाबदार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सौजन्याने आत्महत्या का केली? याचा तपास पोलीस करत आहेत. नोटमध्ये सौजन्याने कुटुंबीयांची माफी मागितली आहे. ही सुसाईट नोट सौजन्याने २७ सप्टेंबर रोजी लिहिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सौजन्या नैराश्याचा सामना करत होती. यासंदर्भातील माहिती तिने नोटमध्ये दिली आहे.

या प्रकरणी पोलीस सौजन्याचे कुटुंबीय आणि मित्र मैत्रीणींची चौकशी करत आहेत. नोटमध्ये सौजन्याने तिला कोणताही आजार नसल्याचे म्हटले आहे. पण, तणावात असल्याचे तिने सांगितले. या कठीण काळात मदत करणाऱ्या सर्वांचे तिने आभार मानले आहेत. सौजन्याने आजवर अनेक दाक्षिणात्य मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या सोबत काम करणाऱ्या लोकांची देखील चौकशी पोलीस करत आहेत.