गोष्ट स्वातंत्र्य सैनिकाची; सरदार उधम सिंगचा ट्रेलर प्रदर्शित
मनोरंजन

गोष्ट स्वातंत्र्य सैनिकाची; सरदार उधम सिंगचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : क्रातिकारक सरदार उधम सिंग यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा ट्रेलर प्रदिर्शित झाला आहे. चित्रपटात अभिनेता विकी कौशल प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. विकीने दोन दिवसांपूर्वी या चित्रपटचा टीझर त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सरदार उधम सिंग हे एक महान स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांच्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट आहे. या ट्रेलरमध्ये त्यांनी हाती घेतलेल्या ऑपरेशनची झलक बघायला मिळते. ट्रेलरच्या सुरुवातीला कागदपत्रे दाखवण्यात आली आहेत. त्यात अनेक पासपोर्ट दिसत आहेत. पुढे खोटी ओळख पत्रे बनवून सरदार उधम सिंग हे इंग्लंडमध्ये जातात, त्यांच्या टार्गेटचा पाठलाग करतात. दरम्यान त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. ही रोमांचक कथा १६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

सरदार उधम सिंग हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शूजित सिरकार यांनी केले आहे. तर राइजिंग सन फिल्म्सने किनो वर्क्सच्या सहकार्याने या अॅमेझॉन ओरिजिनल मूव्हीची निर्मिती केली आहे.