सेवानिवृत्तीअगोदर राजाराम पाटलांचा आईला कडक सॅल्युट!
बातमी महाराष्ट्र

सेवानिवृत्तीअगोदर राजाराम पाटलांचा आईला कडक सॅल्युट!

मुंबई : दिवंगत गृहमंत्री आर.आर.पाटील यांचे बंधू राजाराम पाटील हे आज कोल्हापूर येथे पोलीस सेवेतून निवृत्त झाले. त्याआधी त्यांनी पोलीस सेवेतील शेवटचा दिवस असल्याने आईला ड्युटीवर जात असताना सॅल्युट केला. आर.आर.पाटील म्हणजेच राजाराम पाटील यांची काही महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयातून कोल्हापूर परिसरातील करवीर येथे डीवायएसपी म्हणून नियुक्ती झाली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राजाराम पाटील यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात दीड वर्ष सहाय्यक पोलीस आयुक्तपदी काम पाहिलं. साधे राहणीमान आणि उच्च विचार असे पाटील आहेत. भेटणाऱ्या प्रत्येक नागरिकांना आणि पोलीस कर्मचाऱ्यांना आर. आर. पाटील हे आपुलकीने बोलायचे. त्यांची विचारपूस करायचे.

दरम्यान, ज्या प्रमाणे दिवंगत आर. आर. पाटील यांना आबा असे संबोधले जायचे त्याच प्रमाणे डीवायएसपी राजाराम पाटील हे देखील तात्या नावाने लोकप्रिय आहेत. कोविडच्या काळात त्यांनी मोलाची कामगिरी बजावत पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांना वेळीच उपचार मिळावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केले. राजराम पाटील यांची पोलीस सेवा ही ३३ वर्ष झाली असून स्वतःचा सख्खा भाऊ १२ वर्षे गृहमंत्री असतानाही त्यांनी २० वर्षे साइड ब्रँचला काम केले. राजराम पाटील यांना ६५१ बक्षीस, दोन वेळेस राष्ट्रपती पदक मिळालेले आहेत.