करण जोहरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार हा दाक्षिणात्य सुपरस्टार; फर्स्ट लूक व्हायरल
मनोरंजन

करण जोहरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार हा दाक्षिणात्य सुपरस्टार; फर्स्ट लूक व्हायरल

मुंबई : चित्रपट निर्माता करण जोहरच्या आगामी चित्रपटातातून दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ हे करणार असून चित्रपटाची निर्मिती करण जोहर करणार आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काही दिवसांपूर्वी करण जोहर नव्या चित्रपटाची घोषणा करणार असल्याचे म्हटले जात होते. आता करणने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषण केल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. नुकताच करणने सोशल मीडियावर आगामी चित्रपटाची घोषणा करत चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.

करण जोहर आणि त्याची संपूर्ण टीम आगामी चित्रपटाच्या कामामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचे नाव Liger: साला क्रॉसब्रीड असे आहे. या चित्रपटातील फर्स्ट लूक करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये विजय देवरकोंडा फायटरच्या रुपात दिसत आहे. त्याचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. विजयचा हा लूक पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.