सुशांत सिंहसोबत काम केलेल्या अभिनेत्याची बायकोला कंटाळून आत्महत्या
मनोरंजन

सुशांत सिंहसोबत काम केलेल्या अभिनेत्याची बायकोला कंटाळून आत्महत्या

मुंबई : सुशांतसिंह राजपूतसोबत एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी या सिनेमात झळकलेला अभिनेता संदीप नाहर याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अक्षय कुमारसोबत केसरी चित्रपटात, तसेच अनेक टीव्ही मालिकांमध्येही संदीपने विविध भूमिका साकारल्या होत्या.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुंबईत गोरेगावमधील राहत्या घरात संदीपचा मृतदेह आढळला. आत्महत्येपूर्वी संदीपने फेसबुकवर एक व्हिडिओ आणि सुसाइड नोट शेअर केली. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. आता जगण्याची इच्छा होत नाहीये. जीवनात अनेक सुख दु:ख बघितले, पण सध्या मी ज्या परिस्थितीतून जात आहे ती सहनशीलतेपलीकडची आहे. आत्महत्या करणं भीत्रेपणाचं लक्षण आहे हे मला माहितीये, मलाही जगायचं होतं. पण जिथे आत्मसन्मान आणि समाधान नसेल तिथे जगून तरी काय फायदा…माझी पत्नी कांचन शर्मा आणि तिची आई विनू शर्मा यांनी मला कधी समजून घेतलं नाही किंवा कधी साधा तसा प्रयत्नही केला नाही. असे म्हणत आत्महत्येप्रकरणी बायको आणि तिच्या आईला म्हणजेच संदीपने सासूला जबाबदार ठरवलं आहे.

संदीपने पुढे लिहले आहे की, माझी बायको शिघ्रकोपी आहे. आमच्या दोघांच्याही व्यक्तीमत्वात खूप फरक आहे. रोज सकाळ-संध्याकाळ होणारी भांडणं सहन करण्याची ताकद आता माझ्यात नाही. यात माझ्या बायकोची चूक नाही. कारण तिला सगळं नॉर्मल वाटतं. पण माझ्यासाठी हे सामान्य नाही. मुंबईत अनेक वर्षांपासून आहे. खूप वाईट वेळही बघितली पण कधी ढासळलो नव्हतो. आत्महत्या मी खूप आधीच केली असती, पण मी स्वतःला वेळ दिला. सर्व ठिक होईल असं वाटलं. पण रोजच भांडणं होतात. या चक्रव्युहात अडकलोय. बाहेर पडण्याचा याशिवाय दुसरा रस्ता नाही. आता मला हे पाऊल आनंदाने उचलावं लागेल. इथल्या जीवनात नरक बघितला. इथून निघून गेल्यानंतर काय होईल माहिती नाही पण जे काही होईल मी त्याचा सामना करेल. शेवटी संदीपने एक विनंती करताना, एक रिक्वेस्ट है. मेरे जाने के बाद कांचन को कुछ मत बोलना पर उसके दिमाग का इलाज जरुर करवा लेना, असं त्याने सुसाइड नोटमध्ये संदीपने नमूद केलं आहे.