प्रभास-सैफसोबत आदिपुरुषमध्ये दिसणार ही अभिनेत्री
मनोरंजन

प्रभास-सैफसोबत आदिपुरुषमध्ये दिसणार ही अभिनेत्री

मुंबई : आदिपुरुष या चित्रपटात अभिनेता प्रभास आणि अभिनेता सैफ अली खान सोबत अभिनेत्री क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच अभिनेता सनी सिंह देखील चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे. चित्रपटात प्रभास, सैफ आणि क्रितीला एकत्र पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

क्रितीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सैफ आणि प्रभाससोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने नव्या प्रवासाला सुरुवात असे कॅप्शन दिले आहे. काही दिवसांपूर्वी ओम राऊत यांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. हा चित्रपट श्रीरामचंद्रावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटात प्रभास प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे तर सैफ रावणाची भूमिका साकारणार आहे. तसेच हा चित्रपट थ्री डी अॅक्शन ड्रामा प्रकारात मोडणारा असून भूषण कुमार याची निर्मिती करत आहेत. २०२२ मध्ये हा चित्रपट प्रेक्षाकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

चित्रपट दिग्दर्शक ओम राऊत यांचा तान्हाजी : द अनसंग वॉरिअर हा सुपरहिट ठरल्यानंतर त्यांचा आदिपुरुष हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटात कोणती अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार अशा चर्चा रंगल्या होता. त्यानंतर क्रिती ही भूमिका करणार असल्याचे समोर आले आहे.