…म्हणून सलमानने कधीच केले नाही जुही चावलासोबत काम
मनोरंजन

…म्हणून सलमानने कधीच केले नाही जुही चावलासोबत काम

मुंबई : बॉलिवूडमध्ये ९०च्या दशकात जुही चावला ही एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. जुही चावलाने आमीर खानसोबत ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट सुपरहिट झाला आणि जुही चावला एका रात्रीत सुपरस्टार झाली. आपल्या बॉलिवूड करिअरमध्ये जुही चावलाने अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलं. मात्र जुही चावला कधीही सलमान खानसोबत दिसली नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सलमान खान आणि जुही चावलाने एकत्र काम न करण्यामागे खूप मोठं कारण आहे. जुही चावलाने एका चित्रपटासाठी सलमानला दिलेला नकार यासाठी कारणीभूत ठरला होता. जुही चावलाने आपला केलेला अपमान सलमानच्या मनाला इतका लागला होता की, त्याने नेहमीच तो लक्षात ठेवला. जुही चावला खूप मोठी स्टार होती. तिच्यासोबत काम करण्याचं स्वप्नं प्रत्येक अभिनेता पाहत होता. त्यावेळी सलमानचे चित्रपट फारसे चालत नव्हते. पण सलमानची प्रसिद्धी कमी झालेली नव्हती. अनेक निर्माता-दिग्दर्शक सलमानला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी उत्सुक होते. एका दिग्दर्शकाला सलमान खान आणि जुही चावलाला एकत्र घेऊन चित्रपट करायचा होता. चित्रपटाची ऑफर घेऊन ते जुही चावलाकडे गेले.

त्यावेळी सलमानचे चित्रपट फारसे चालत नव्हते. पण सलमानची प्रसिद्धी कमी झालेली नव्हती. अनेक निर्माता-दिग्दर्शक सलमानला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी उत्सुक होते. एका दिग्दर्शकाला सलमान खान आणि जुही चावलाला एकत्र घेऊन चित्रपट करायचा होता. चित्रपटाची ऑफर घेऊन ते जुही चावलाकडे गेले. पण, जुहीने या उत्तर देण्यासाठी बराच वेळ घेतला. अखेर तिने चित्रपट करण्यासाठी नकार दिला. इतकंच नाही तर जुहीने चित्रपटात सलमान खानऐवजी आमीर खानला घेण्याचा सल्ला दिला. पण दिग्दर्शकाला सलमान जुही हीच जोडी हवी होती. पण ते शक्य होऊ शकलं नाही. आपला हा अपमान सलमान खान कधीच विसरला नाही आणि त्याने कधीही जुही चावलासोबत काम केलं नाही.

फक्त एकदा डेव्हिड धवन, अनिल कपूर आणि गोविंदा यांनी केलेल्या विनंतीमुळे ‘दिवाना मस्ताना’ चित्रपटात सलमानने जुहीसोबत एका सीनसाठी पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावली होती. याशिवाय दोघांनी कधीही एकत्र काम केलं नाही. जुहीबद्दलचा तो राग अद्यापही सलमानच्या मनात आहे. आजही सलमान जुहीला जास्त भाव देत नाही. दुसरीकडे जुहीने मात्र अनेकदा सलमानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपण सर्व अभिनेत्यांसोबत काम केलं आहे, पण सलमानसोबत नाही असं तिने अनेकदा म्हटलं आहे. महत्वाचं म्हणजे जेव्हा जुही ‘बिग बॉस’च्या सेटवर आली होती तेव्हा जुहीने एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा सलमानने आईची भूमिका ऑफर केली होती.