मायावतींशी मिळतीजुळती व्यक्तीरेखा असणाऱ्या मॅडम चिफ मिनीस्टरचा ट्रेलर रिलीज
मनोरंजन

मायावतींशी मिळतीजुळती व्यक्तीरेखा असणाऱ्या मॅडम चिफ मिनीस्टरचा ट्रेलर रिलीज

मुंबई : सुभाष कपूर दिग्दर्शित मॅडम चिफ मिनीस्टरचा दमदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. कपूर यांनी यापूर्वी जॉली एलएलबी या सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे. कपूर यांनी 1990 साली एडिलीतून राजकीय पत्रकाराच्या रूपात आपलं करियर सुरू केलं होतं. त्यांनी त्याकाळात उत्तर भारत कव्हर केला. हा अनुभव या सिनेमाच्या दिग्दर्शनात त्यांना कमी आल्याचं दिसतं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा सतत तिच्या पडद्यावरच्या ताकदीच्या भूमिका आणि पडद्याबाहेरच्या भूमिकांमुळेही चर्चेत असते. आता अजून एका स्त्रीशक्तीचं वास्तव दर्शन घडवणाऱ्या सिनेमात महत्त्वाच्या रोलमध्ये ती दिसत आहे. मॅडम मुख्यमंत्रीमधले खणखणीत डायलॉग आणि वेगळा गेटअप यामुळे रिचाच्या या सिनेमाविषयी उत्सुकता असेल.

सिनेमाचं ट्रेलर जरी सिनेमाचा वास्तवाशी कसलाही संबंध नसल्याच्या सूचनेनं सुरू होत असलं तरी या सिनेमाची मुख्य व्यक्तिरेखा उत्तर प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्याभोवती गुंफलेली असल्याचं जाणवत असल्याची चर्चा आहे. या सिनेमाचं शूटिंग लखनऊमध्ये झालं. पुरुषसत्ताक सत्तासंबंधांनी घट्ट वेढलेल्या वातावरणात एक स्त्री संघर्षातून वर येत सत्तेची गणितं कशी बदलते याचा वेध हा सिनेमा घेतो. इतके गुंतागुंतीचे पदर असलेली व्यक्तिरेखा करायला मिळाल्याचा खूप आनंद असल्याची भावना रिचानं ट्रेलर लॉंचच्या वेळी व्यक्त केली.