तपासी पन्नू, अनुराग कश्यपसह बॉलिवूड कलाकारांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी
मनोरंजन

तपासी पन्नू, अनुराग कश्यपसह बॉलिवूड कलाकारांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी

मुंबई : बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध कलाकारांच्या घरी आज आयकर विभागाने छापेमारी केली आहे. कर वसुली आणि कर भरणा संदर्भात अभिनेत्री तापसी पन्नू, अनुराग कश्यप, मधु मेंटेना, विकास बहल यांच्या घरी छापेमारी आयकराने सकाळी छापेमारी केली. मिळालेल्या माहितीनुसार हा छापे फॅंटम फिल्म्सशी संबंधित आहेत. याव्यतिरिक्त मुंबईत बऱ्याच ठिकाणी आयकर विभागाकडून ही छापेमारी सुरु आहे. चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या मालमत्तांवर मुंबईत छापे टाकण्यात आल्याची माहिती आयकर विभागाने एका निवेदनाद्वारे दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तर,सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (सीबीडीटी) चे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सीएनएन-न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानसार, फॅन्टम फिल्म्सच्या कामांवरही छापे टाकण्यात आले आहेत. फॅंटम चित्रपटाच्या कर चुकवण्याच्या संदर्भात हा छापा टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या लोकांनी मोठ्या प्रमाणात कर चुकवेगिरी केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मुंबईसह त्यांच्या इतर ठिकाणांवरदेखील छापेमारी सुरु आहे. या प्रकरणात यांच्यासह आणखी बरीच मोठी नावे उघडकीस येऊ शकतात. त्यामुळे आयकर विभागाची टीम मुंबई, पुण्यासह २० हून अधिक ठिकाणी एकाचवेळी छापा टाकत आहे.

दरम्यान, तापसी पन्नूच्या घरी आयकराने का छापेमारी केली आहे याची माहिती अद्याप समोर आली नाही. कर चोरी अथवा कर चुकवेगिरी प्रकरणात मुंबई आणि पुणे या शहरातील 22 ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. तर विकास बहल, अनुराग कश्यप आणि मधु मेंटेना याच्या फॅन्टम फिल्मस संबंधित कर चोरी प्रकरणातील आहे. हे तिघेही या प्रोडक्शन हाऊसचे संस्थापक आहेत तर अनुराग कश्यप या प्रोडक्शन हाऊसचा मालक आहे.

तापसी पन्नू आपल्या अभिनयासोबतच सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवर आपली मते मांडण्यास प्रसिद्ध आहे. देशातील सुरु असलेल्या परिस्थितीवर तिने अनेकदा आपले मत निर्भिडपणे व्यक्त केलं आहे. तापसी पन्नू गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या अनुभव सिन्हाच्या थप्पड या चित्रपटात दिसली होती. अनुराग कश्यप आता आपल्या ‘दोबारा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या व्यतिरिक्त तापसी ही अनुराग कश्यपच्या आगामी थ्रिलर फिल्म ‘दोबारा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ‘लूप लपेटा’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.