भाजपने ईडी लावली तर शिवसेनेनेही काढलं हे शस्त्र; प्रसाद लाड रडावर
राजकारण

भाजपने ईडी लावली तर शिवसेनेनेही काढलं हे शस्त्र; प्रसाद लाड रडावर

मुंबई : भाजपने ईडी लावली तर शिवसेनेनेही एक शस्त्र बाहेर काढले आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने समन्स बजावल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या नेत्यांमागे ईडी लागल्याने विरोधकांकडून टीका केली जात होती. त्यात आता भाजपच्या आमदाराच्या मागेही नवं चक्र सुरू होतं की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

20 दिवसांपूर्वी प्रसाद लाड यांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रसाद लाड यांच्यावर बीएमसीतील घोटाळ्याचा आरोप आहे. 2009 मध्ये मुंबई महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवहाराचा प्रसाद लाड यांच्या आरोप होता. त्यानंतर 2014 मध्ये त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. प्रसाद लाड हे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीयांपैकी एक आहेत.

या प्रकारानंतर लाड म्हणाले, या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, तर सुडबुद्धीने ही नोटीस पाठविण्यात आली आहे. ते पुढे म्हणाले की, प्रसार माध्यमांच्या वतीने मला कळालं की मला नोटीस आलेली आहे. मालाड वेस्टला नोटीस मिळाली. माझं मालाड वेस्टला कोणतंही घर नाही.