बंगळुरुचा कोलकात्यावर दणदणीत विजय; ३८ धावांनी केलं पराभूत
क्रीडा

बंगळुरुचा कोलकात्यावर दणदणीत विजय; ३८ धावांनी केलं पराभूत

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने कोलकाता नाईट रायडर्सवर दणदणीत विजय मिळवला आहे. विराट कोहलीच्या संघाचा स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय आहे. आयपीएल गुणतालिकेत बंगळुरुचा संघ आता अव्वल स्थानी पोहोचला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बंगळुरुने कोलकात्यासमोर २०५ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. त्यामुळे झटपट फलंदाजी करण्याच्या नादात सलामीवीर शुबमन गिल ९ चेंडूत २१ धावा, राहुल त्रिपाठी २० चेंडूत २५ धावा, नितीश राणा ११ चेंडूत १८ धावा, तर दिनेश कार्तिक केवळ २ धावा करुन तंबूत परतला. कर्णधार ईऑन मॉर्गनही २३ चेंडूत २९ धावा करुन तंबूत परतला. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर फटका मारताना थेट कोहलीच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्यानंतर आंद्रे रसेलनं आक्रमक फलंदाजी करत संघाच्या आशा कायम ठेवल्या. मात्र, तोही संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. त्याने २० चेंडूत ३१ धावा केल्या. त्यात ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे.

तत्पूर्वी, बंगळुरुला डावाच्या सुरुवातीलाच दोन धक्के बसले. कर्णधार विराट कोहली आणि रजत पाटिदार झटपट बाद झाले. विराट ५ धावांवर बाद झाला. तर रजत पाटिदार वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि देवदत्त पडिक्कल जोडीनं बंगळुरुचा डाव सावरला. मात्र देवदत्त पडिक्कल २५ धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या एबी डिव्हिलियर्स आणि मॅक्सवेल जोडीनं संघाच्या धावसंख्येत भर घातली. मॅक्सवेल पॅट कमिन्सच्या चेंडूवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात हरभजन सिंगच्या हाती झेल देऊन बाद झाला. तिथपर्यंत बंगळुरुने सन्मानजनक धावा केल्या होत्या.