राज्यात कोरोनाचे तांडव; ५००पेक्षा जास्त मृत्यू तर, एवढ्या नव्या रुग्णांची नोंद
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात कोरोनाचे तांडव; ५००पेक्षा जास्त मृत्यू तर, एवढ्या नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात कोरोनाचे अक्षरशः तांडव सुरु आहे. नवीन रुग्णांसोबत मृत्यूच्या आकडाही वाढताना दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात ६८ हजार ६३१ कोरोनाबाधित वाढले असून, ५०३ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या रुग्णांची संख्या ही आजपर्यंतची राज्यातील सर्वोच्च संख्या आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सध्या राज्यातील मृत्यू दर १.५८ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत ६० हजार ४७३ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण ६,७०,३८८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याचबरोबर, आज ४५ हजार ६५४ रुग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३१ लाख ०६ हजार ८२८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.९२ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३८,५४,१८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३८,३९,३३८ (१६.१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३६,७५,५१८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,५२९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.